STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

2  

JYOTI GOLE

Others

षंढ

षंढ

1 min
50

तुला लाज नाही वाटत

का रे स्त्रीवर बलात्कार करताना..?

बाजारात विकून खाल्ल्यास का

तू तुझ्या संवेदना....??

तू कसला मर्द...?

तू तर षंढ वासनेने बरबटलेला.

पण एक लक्षात ठेव तू नाहीस

आकाशातून पडलेला.

तुलाही आहेत मायबहिणी.

वावरत असेल तुझ्याही घरी

एखादी चिमुकली गोड परी

उद्या त्यांच्यावरच अशी वेळ

आली तर....??

विचार तूच तुझ्या मनाला

आणि थांबव आता हे

बलात्काराचे सत्र

नाहीतर स्त्रीला दुर्गा बनून

हाती घ्यावे लागेल शस्त्र.


Rate this content
Log in