तुझ्याचसाठी
तुझ्याचसाठी
तुझ्याचसाठी गुंफली
मी प्रीतफुलांची माला,
मम हृदयी प्रीतगंध
दाटूनिया बघ आला.
तुझ्याचसाठी निर्मिले
प्रीतीचे मधुसंगीत,
मम नेत्र आसुसले
पाहाण्या तव सुस्मित.
तुझ्याचसाठी रचिली
मम स्वप्नांची दुनिया,
केले तुज हृदयदान
काय घडे ही किमया.
तुझ्याचसाठी जडला
मज प्रीतीचा ग छंद,
ये प्रिये मज भेटाया
तू तोडून सारे बंध.

