का बरे वदता स्त्रीला अबला?
का बरे वदता स्त्रीला अबला?
स्त्रीविना नच अर्थ पौरूषाला
का बरे वदता स्त्रीला अबला?
सोडूनी ती माहेराला
पुरूषाची होते भार्या,
प्रीतीची करून वर्षा
पतीची ती होते छाया
अर्धांगी वदता जर पत्नीला
का बरे.वदता स्त्रीला अबला? ll१ll
साहुनिया प्रसव वेदना
बालकास ती देते जन्म
हातांचा करून पाळणा
ममतेने करते संगोपन
जर असे थोरपण जगी मातेला
का बरे वदता स्त्रीला अबला? ll२ll
होऊन गेल्या शूर महिला
जिजाऊ अन् झाशीवाली
सोशिते धैर्याने दुःखे सारी
लेवुनिया ती सुहास्य गाली
ना तोड जगी तिच्या सोशिकतेला
का बरे वदता स्त्रीला अबला? ll३ll
आधुनिक नारी ज्ञानसंपन्न
स्वावलंबी अन् कर्तृत्ववान
संसार सांभाळून अर्थार्जन
करते जपण्या स्वाभिमान
नवयुगात नारी रणरागिणी सबला
का बरे वदता स्त्रीला अबला? ll४ll
