STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

3  

JYOTI GOLE

Others

आपण दोघे

आपण दोघे

1 min
151

आयुष्याच्या वळणावरती

अवचित भेटलो आपण दोघे.


नजरेला नजर भिडवूनी

हलकेच हसलो आपण दोघे.


हाँ हाँ ना ना करता करता

बोलू लागलो आपण दोघे.


नकळत मैत्रीचे धागे अन्

विणू लागलो आपण दोघे


मैत्री मैत्री म्हणत असता

प्रेमात पडलो आपण दोघे.


प्रेमाची गोडगुलाबी स्वप्ने

पाहू लागलो आपण दोघे.


प्रेमाच्या त्या आणाभाका

घेऊ लागलो आपण दोघे.


घरच्यांना सारे कळले अन्

बोहल्यावर चढलो आपण दोघे.


नव्या नव्हाळीचे प्रेमगीत ते

गाऊ लागलो आपण दोघे.


तू तू मैं मैं करता करता

भांडू लागलो आपण दोघे.


भांडणतंटा विसरून पुन्हा

संसारी रमलो आपण दोघे.


आयुष्याच्या वळणावरती

अवचित् भेटलो आपण दोघे.


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை