क्षमता
क्षमता
1 min
427
ओळख तू तुझ्यातील क्षमता सारी सुखे असतीलही तुझ्या पायाशी पण कितीही म्हटलं
तरी सोन्याचा पिंजराच तो
त्या पिंजराच्या बाहेर आहे उत्तुंग आकाश आणि ते खुणावतय तुला कर्तृत्वाची
झेप घेण्यासाठी
पण तू मात्र अडकून पडलीस बाईपणात अन् आईपणात
मी म्हणत नाही मुळीच तुला की तू अगदीच सोडून दे तुझा प्रिय पिंजरा पण कधीतरी घेत जा भरारी ह्या उत्तुंग आकाशात
आणि देत जा तुझ्यातील क्षमतेला तूच न्याय
ओळख तुझ्यातील क्षमता आणि दे तूच न्याय
