STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

4  

JYOTI GOLE

Others

माझी प्रीत

माझी प्रीत

1 min
250

जरी माझी प्रीत

अव्यक्त, अबोल

परि मम हृदयी

असे तिला मोल


जरी माझी प्रीत

निर्मळ, पवित्र

दिसताच सखा

सुखावती नेत्र


जरी माझी प्रीत

अप्राप्त, दुर्गम,

भावूक मनांचा

सुरेख संगम


जरी माझी प्रीत

गुलाबी गुपित,

जपते मी नेहमी

मनाच्या कुपीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन