STORYMIRROR

Pradnya Ghodke

Romance

3  

Pradnya Ghodke

Romance

पहिलं प्रेम...

पहिलं प्रेम...

1 min
179

बोलले मी कधीच नाही,

प्रेम तेच होते..

फांदीवरती मनातल्या,

बुलबुल गात होते...! १.


किती पहारे सज्ज आणि,

मज्जावही फार होते..

तरी..ओढ! अनामिक गोड,

ते बंधच अनुबंध होते...! २.


वळवावी कितीदा नजर,

तरीही..डोळे तेच होते..

वळणावरच..प्रियाचे घर,

पाऊल तेथेच वळत होते...! ३.


नव्या फुलांचे नवते गंध,

किती दरवळ..हळवे धुंद..!

नभाची ती पोकळी त्यात,

पाखरू..फडफडे बेधुंद...! ४.


किती गोड अदमास अन,

अंदाजहि अनोखे होते..

सांगायचे टाळले मी पण,

"पहिले प्रेम" तेच होते...! ५.


"पहिले प्रेम" तेच होते...!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance