STORYMIRROR

Pradnya Ghodke

Classics

4  

Pradnya Ghodke

Classics

शब्दांच्या बाहुपाशात

शब्दांच्या बाहुपाशात

1 min
2


शब्दांच्या बाहुपाशात

बिलगून मी असते

जागीच असते

स्वप्नातही...!


शब्दांचा स्पर्श

मला नशा आणतो

जागेच ठेवतो

रात्रीही...!


माझा श्वास 

शब्दांच्या खुळया नशेत 

गुंतून भासात

त्याच्याच...!

 

किती आठवणी

वेणी शृंखलेत गुंफतो 

भास होतो

गुंफून...!


स्पर्शगंध त्यांचा

उराशी मी जपते

कधीच नसते

एकटी...!


भरून आहे

अंतर्मन आणि तनमनात

शोध नि:शंकोचात

सहवास...!

 

शृंखला शब्दांची 

कशी थांबवू थांबवेना 

बाहुतून सोडवेना

कधीच...!

 

अलगद बाजूला

शब्दमालेचा शृंगार काढते

पेलून घेते

प्रपंचभार...!


         प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics