एक वेळ पुन्हा
एक वेळ पुन्हा
तुला पाहताच
जगण्याचा विचार आला
जागा झाला
आभास...!
बंद ओठ
डोळ्यात प्राण आला
संवाद मनातला
ओळखला...!
नि:शब्द लिपीत
एक वेळ पुन्हा
बंदिस्त खुणा
प्रतिक्षेत...!
पाऊस आला
एक वेळ पुन्हा
घडला गुन्हा
प्रेमाचा...!
दरवळणारा मृद्गंध
पुन्हा मनसोक्त प्यायला
गालावर ओघळला
थेंब...!
आवाज न
करता शांतपणे झिरपला
पानांवरून ओघळला
अश्रूप्रमाणे...!
एक वेळ
पुन्हा अनाहूतपणे डोकावला
डोळ्यातून झरला
सख्यासारखा...!
एक वेळ
पुन्हा वर्षाव होतो
रिता करतो
आठवांना...!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
