STORYMIRROR

Pradnya Ghodke

Tragedy

4  

Pradnya Ghodke

Tragedy

काळाच्या हातचे बाहुले...!

काळाच्या हातचे बाहुले...!

1 min
4


वादळांचे आभाळ

अचानक कसे फाटले

जणू कोसळले

काळजात...!


काळजात ज्यांनी

सुखदु:ख होते पेरले

अश्रू आले

वाट्याला...!


चारी दिशांनी

स्मृतींचे तुफान आले

नाते गेले

दडपून...!


दडपलेले श्वास

असे आत कोंडले

हृदय थांबले

नकळत...!


एकमेव आधार

जिव्हाळ्याच्या नात्यांचे संपले

नाहक गमावले

अस्तित्व...!


आशेवर उद्याच्या

ज्यांनी श्वास रोखले

तेही संपले

प्रतीक्षेत...!


का दैवाने

असे तोंड फिरवले

खेळ झाले

जिवाशी...!


उजेड संपून

भाळ! आभाळही फिरले

क्षीण झाले

दीनही...!


आपण सारेच

काळाच्या हातचे बाहुले

कोणा नाकळे

गुढ...!


            प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy