STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

4  

Pradnya Ghodke

Inspirational

जन्म म्हणजे कैंद...!

जन्म म्हणजे कैंद...!

1 min
0


चौर्‍याऐंशी लक्ष

योनी फिरून येतो

तेव्हा मिळतो

मनुष्यजन्म...!


का सुखाला 

दु:खासम माणसाने मांडावे?

जन्मोजन्मी हिंडावे

यास्तव....!   


मानले जर

जन्म म्हणजे कैद

राही खेद

सदैव...!


खेद करत

वाट मोक्षाची शोधणे

देवाशी भांडणे

उगाच...?


धूर खेदाचा 

आयुष्याला असा वेढतो

श्वासात कोंडतो

स्वत:च्याच...!


जो कोणी

अमृताचे ओझे वाहतो

थेंब सांडतो

ओठी...!


                  सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational