STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

3  

Pradnya Ghodke

Inspirational

नको मनात किल्मिष...!

नको मनात किल्मिष...!

1 min
10


तना,मनाचेच

आपण सारे अंश

जहरीले दंश

कशाला?...


मन जणू

विंचवाचे बिर्‍हाड पाठीशी

नांगी मोठीशी

असणार...!


मनातील किल्मिष

एक जालीम विष

विखारी कोष

विणलेला...!


व्यवहारी जगात

नको मनात किल्मिष

क्रोधित अंश

व्यापणारे...!


द्यावी समज

बर्फ ठेवून डोईवर

जगी वावर

ठेवावा...!


तरण्या भवसागर

नको मनात किल्मिष

देई आशिष

भगवंत...!


       

            सौ. प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational