STORYMIRROR

Pradnya Ghodke

Tragedy

4  

Pradnya Ghodke

Tragedy

घराच्या भिंती...!

घराच्या भिंती...!

1 min
11


घराच्या भिंती

असाव्या स्नेहाने लिंपलेल्या

नको सजलेल्या

शोभेने...!   


अज्ञात प्रीतीच्या

असतात लपलेल्या खुणा

माणसाला आकळेना

कसे...!   


असती उभ्या

भिंती काटेकोर चाकोरीत

कधी इमल्यात,

झोपडीतही..!   


हल्ली भास

हसण्याचे दिसतात भिंतीत

वैभवी दिखाव्यात

माखुन...!   


अंतरात भिंतीच्या

असते कळ वेदनेची

कोवळीक उन्मादांची

शल्येही...!  


घराच्या भिंतीत

विलेपित सुखे कशाला?

गंध वेगळा

मातीचा...!   


सारे असूनही

वाटे अभाव कसला

दबाव असला

भिंतीचा...!   


                 सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

'अंतरीच्या खोल डोही' तून...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy