STORYMIRROR

Pradnya Ghodke

Classics

4  

Pradnya Ghodke

Classics

आभाळ यावं भरून...!

आभाळ यावं भरून...!

1 min
12


दाटलेल्या मेघांनी

आभाळ यावं भरून

रुजावं कोसळून

धरणीत...!   


भरल्या आभाळाची 

व्यथा कुणाला कळावी

धरणी फळावी

हिरवाईने...!   


मेघांचा प्रवास

वार्‍याने द्यावा पिटाळून

दु:खे उफाळून

जळाची...!   


ठरवलेल्या मुक्कामी

जावं हळूच निसटून

वाट ओलांडून

वादळांची...!   


परतीच्या दिशेत

डोंगरावर अलवार टेकावं

पळत रहावं

सहजची...!   


वर्षाव करून 

रिक्त होऊन रहावं

मोकळं करावं

ढगाला...!   


जलदाच्या वेदना

रिकाम्या होताना पहावं

आभाळ यावं

भरून...!


             सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics