STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

4  

Pradnya Ghodke

Inspirational

जावे पुस्तकांच्या गावी

जावे पुस्तकांच्या गावी

1 min
0


संधी मिळताच

पुस्तकांच्या गावी जावे

तिथे पहावे

शब्दरंग...!   


मन उदास

असताना मनसोक्त विहरावे

रंग न्याहाळावे

पानांचे...!   


आपुलकीच्या भावनेने

कोर्‍या पानावर लिहावे

यशाचे पहावे 

पान...!   


काही पाने 

असतात यशाची 

तर काही अपयशाची

चुकवावी...!   


प्रयत्नांची शाई

लेखणीत भरून घ्यावी

कधी नसावी

रिक्त...!   


अक्षरांना जोडून 

ओळी,कथा लिहाव्या

व्यथा मांडाव्या

आगळ्या...!   


जीवनाच्या कादंबरीतील

पान समाधानाने भरावे

गाव भेटावे

पुस्तकाचे...!   



           प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational