STORYMIRROR

Swati Tdesai

Abstract

4  

Swati Tdesai

Abstract

स्वामी

स्वामी

1 min
505

माझं आणि स्वामींच 

एक नातं आहे

त्यांच्यापाशी हक्काचं 

एक खातं आहे. 


रोज किमान एकदा

भेट तिथे देते

आयुष्याचा जमाखर्च

मांडून तिथे येते. 


वाहत्या जीवनात

खाचखळगे येतात

स्वामी पुढे होऊन

हात मला देतात. 


आनंदाचे क्षणही

कधीमधी येतात

ते देखील स्वामींच्याच

चरणी अर्पण होतात.


कधी तरी मात्र

परीक्षेचा क्षण असतो

सहनशक्तीचा 

अंत झाला असतो. 


कितीही, काहीही करा

मार्गच खुंटला असतो.

स्वामीशिवाय अन्य

तरणोपायच नसतो.


अशावेळी स्वामी

पाठीशी उभे असतात

कोंडलेल्या अवस्थेतून

अलगद मोकळं करतात.


आनंदाच्या लाटांवर

सोबत तरंगत असतात.

दुःखाच्या कंटकशय्येवर

मायेची शाल पांघरतात.


सुखाची जमा होते

दुःख मात्र वजा होते

खात्यामध्ये केवळ

आनंदाचीच शिल्लक राहते.


म्हणून म्हणते जमलं नाही

नित्य पूजापाठ करणं.

आणि स्वामींसमोर

रोज लोटांगण घालणं. 


मनापासून साद घालता

प्रचिती नक्कीच येते

प्रेमाने शरण जाता

स्वामींची साथ मिळते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract