STORYMIRROR

Swati Tdesai

Others

3  

Swati Tdesai

Others

आमचं ट्रेनमधलं जीवन

आमचं ट्रेनमधलं जीवन

1 min
26.2K


ट्रेनमधलं जीवन म्हणजे

अळवावरच पाणी असतं.

कधी काय होईल याचं

गणित काही पक्क नसतं.

आज गाडी वेळेवर तर

उद्या उशीर नक्की असतो

आपण उशिरा पोहोचाव तर

गाडीने हॉर्न दिलेला असतो. 

धावत-पळत गाडी पकडताना

कधी पाय निसटलेला असतो.

पोटात गोळा उभा रहाताना

कुठूनसा आधार मिळालेला असतो.

फुललेला श्वास आवरताना

धक्के खात आत पोहोचतो.

नीट उभं रहायला मिळालं तरी 

'आजचा दिवस भरला' समजतो.

कधी रुसवे-फुगवे, कधी हेवेदावे

भांडण, वाद तर रोजचाच असतो.

पण दोन दिवस भेटलो नाही तर

चौकशीचा एक फोन तरी असतो.

डोहाळे जेवण, वाढदिवस

सारं काही आवर्जून साजर होतं.

संक्रांत, दसरा, दिवाळीला

इथे संस्कृतीच दर्शन होतं. 

अशी आमची लोकल ट्रेन

आमची 'लाइफलाईन' आहे.

कशीही असली तरी ती

आमच्यासाठी 'फाईनच' आहे.


Rate this content
Log in