STORYMIRROR

Swati Tdesai

Fantasy

3  

Swati Tdesai

Fantasy

चौकटीतला त्रिकोण

चौकटीतला त्रिकोण

1 min
553

सुंदर, साजिरे घरकुल होते.

राजाराणीने सजवले होते.

छोट्याशा परीने प्रवेश केला

चौकटीत त्रिकोण पूर्ण झाला.


घरकुलात तिघे रमून गेले.

तीनही कोन अभेद्य झाले. 

नात्यांची कडी गुंफली गेली.

घराची चौकट पूर्णत्वा आली.


पण कळेना गणित कुठे चुकले ?

मनाचे कोन कधी वेगळे झाले ?

राणी अन् परीचा हात सुटला

राजा बाजूस कधी हो गेला ?


नात्याची चौकट छेदली गेली.

त्रिकोणाची भुजा निसटून गेली.

एक कोन जरी होता जुळलेला.

त्रिकोणाचा सांधा निखळलेला.


सुंदर घरकुल जरी तडकले.

कुलूप किल्लीत नाते अडकले.

गोलात गुंफलेली किल्ली निघेना

भंगलेले घरकुल तोडू पाही ना. 


स्वप्न एक पुन्हा घरकुल फुलेल.

कोणाशी भुजा जुळून येईल.

राजा राणी परीचे भाग्य उजळेल.

चौकटीत त्रिकोण पुन्हा झळालेलं. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy