ती आणि तो
ती आणि तो
1 min
386
तो येतो गर्जत बरसत
ती येते रिमझिमत,
तो झोडपून जातो
ती हळुवार स्पर्शत.
तो करतो चिंबचिंब
ती हलकेच ओलावते.
तो निरंतर कोसळतो
ती क्षणात येऊन विरते.
तो वटारत येतो डोळे
ती मिचकावून जाते.
तो हसतो गडगडाटी
ती स्मित करून जाते.
त्याचं तिचं नातं असतं
विणलेली नाजूक जाळी
ती व्यापते आयुष्याला
तो येतो संधीकाळी
ती आणि तो जणू
एकत्र गुंफलेले सर.
तो बरसता पाऊस
तर ती आहे हलकी सर.
