STORYMIRROR

Swati Tdesai

Others

3  

Swati Tdesai

Others

जोडू आईशी नाते

जोडू आईशी नाते

1 min
174

इंग्रजाळलेल्या संस्कृतीत

भविष्य हरवतय मराठीचं

ना धड मराठी ना धड इंग्रजी

सँडविच होतयं लहानग्यांच


आईची झाली मम्मा, मॉम

वडिलांचाही पप्पा, डॅड

बहिण भाऊ झाले सिस्, ब्रो

'फुलफॉर्म'ना पडला खो.


ग्रॅनी, ग्रँड पा झाले ऑनलाईन

भेटायची वेळ' 'वीकेंड नाईट'

काका, मामा सगळेच 'अंकल'

काकू, मामी 'आंटी' टिपिकल.


मित्रमैत्रिणी 'फ्रेंडस्' झाले

नमस्काराचे 'हाय' हैलो' झाले

प्रेमळ 'पापा'चे 'हग' झाले

शब्दांचे सौंदर्यच लोपले.


म्हणूनच...


शब्दांतले वैविध्य, भाषेतला गोडवा

अनुभवायला नात्यांतला ओलावा


आपली संस्कृती जपून बघा

मराठी बोलून बघा

मावशीशी मैत्री करता करता

आईशीही नाते जोडून बघा.


Rate this content
Log in