STORYMIRROR

sunny bhosale

Inspirational

4  

sunny bhosale

Inspirational

प्रेम म्हणजे काय?

प्रेम म्हणजे काय?

1 min
340

आनंद तिच्या होकारात

काटा तिच्या नकारात

पण त्या काट्याला ही जपणं हृदयात 

............म्हणजे प्रेम!


तिच्या जीवाचं न करता खेळणं

नाही तिला पेटवता,

तिच्या आठवणीत स्वतः अखंड 

हृदय जाळत राहणं

...............म्हणजे प्रेम!


ना तिच्यावर हल्ला करणं

ना करता तिला विद्रुप

स्वतः विरहाचे चटके सोसून 

दुनियेसमोर ठेवतो

उदाहरणार्थी एक सुंदर रूप

.............म्हणजे प्रेम!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational