STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

मित्र माझा

मित्र माझा

1 min
207

आयुष्यात खूप माणसे

मी कमावली स्वभावाने

स्वभावाने नाते जुळले

जुळलेले जोडले प्रेमाने.


जीवनाच्या वाटेवर मित्र

असे आले गेले वेगवेगळे

अर्ध्यावर डाव मोडून ते

आपल्या वाटेने गेले सगळे.


पण बालपणापासून एकच

खरा मित्र माझा आहे मजला

परम मित्र तो दिला होता मला

माझ्या त्या थोर गुरुजीनी मजला.


सुख दुःखात किंवा आजरपणात

सतत सोबत त्याची लाभली

त्याच्यामुळे पदव्या मिळवल्या

जगाशी त्याच्यामुळे ओळख जमली.


ह्या माझ्या पुस्तक मित्रामुळे

कधी जाणवला नाही एकटेपणा

ज्ञान वृद्धी वाढवली सर्व क्षेत्रात

आज ही आनंद देतो मज म्हातारपणा


आयुष्यभर साथ देणारा मित्र खरा

एकच एक असतो माणसाला

हा व्यसन लावतो वाचण्याचे

वेड वाचनाचे देतो आनंद मनाला.


वाचाल तर वाचाल मंत्र जीवनाचा

सवय लावून घ्या स्वतःला व मुलांना

सोने होईल त्यांच्या आयुष्याचे खास

जर मित्र बनवले त्यांनी ह्या पुस्तकांना.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational