STORYMIRROR

Kalpana Deshmukh

Inspirational

3  

Kalpana Deshmukh

Inspirational

ज्ञानदूत

ज्ञानदूत

1 min
258

पुस्तकांच्या जगात वाटतं

अगदी मनापासून रमावं

अभ्यासून ही ग्रंथगाथा

ज्ञानभांडार वेचत जावं ।।


एकाकी असतो जेव्हा

पुस्तक आपले सच्चे मित्र

झाली नसती यांची निर्मिती

अज्ञान दिसले असते सर्वत्र ।।


ग्रंथचरित्र, प्रवास वर्णन

काव्य, अभंग, पत्र, गझल

कथा, कादंबरीयातून व्यक्त

साहित्यातील प्रकार विपुल ।।


पुस्तकांच्या सहवासात

प्रगल्भ होतात विचार

स्वतःला शोधण्याचा

देई तोच सखा आधार ।।


ग्रंथाविना कैसे जीवन

अवघ्या विश्वाचे ज्ञान त्यात

वाचनाने समृद्ध हो मानवा

तोच भविष्यातील ज्ञानदूत ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational