बाबा तुम्ही असतात तर......*
बाबा तुम्ही असतात तर......*
बाबा तुम्ही असता तर
कशाची ही खंत उरली नसती
तुमच्या सानिध्यात
मूर्ती माझी घडली असती
बाहेरचे जग खूप कठीण आहे
कसे मी जगू सांगा मला
रोज होणाऱ्या यातना
भोगू कसे कळे ना मला
डोक्यावर हात हवा
आधार देण्यासाठी
पाठीवर थाप हवी
शाब्बासकी साठी
खरंच बाबा तुम्ही असता तर
जीवन सुंदर झाले असते
मी तुमची राजकुमारी
गर्वाने सर्वांना दाखविले असते
