Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Inspirational

3  

Neha Ranalkar

Inspirational

आठवणी मामाच्या

आठवणी मामाच्या

1 min
449


आठवते बालपण अजूनही मला

आठवते सुटीत मामाकडे जाणं |

आठवतात मामे भावंडं,बहिणी

त्यांबरोबरच गप्पा मारीत खाणं | |१| |


आठवते मामीच्या हातची कढी,

पाटोड्यांची भाजी खुमासदार |

आठवतं चौपट, लंगडी पळापळी

खेळ खेळून हसण्यातली बहार | |२| |


आठवतं मामाच्या सोनारकीतलं

तरबेज असणं नथींच नक्षीकाम |

अभिमान वाटायचा दुकानातली

गर्दी पाहून मजूरीचा कमी दाम | |३| |


उन्हाळ्यात रात्रीचं ते गच्चीवर 

झोपणं चांदण्यांचा आनंद लुटत |

सर्व गल्लीतले उठल्यावर आम्हा

भावंडाचे सर्वच इलाज खुटत | |४| |


नास्ता हातात मिळे उपमा कधी

गरमागरम भजी पापड नि चहा |

मामींचं पाककलेतलं कौशल्य

म्हटलेलं आग्रहाने अजून रहा | |५| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational