STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

पुस्तके

पुस्तके

1 min
270

पुस्तके रंजल्या गांजल्यांची सावली 

अनाथांना कायम साथ देणारा वाली 

इतिहासात जहाल मवाळ विचारांचे मंडळ 

जबरदस्त क्रांती करणारी महान चळवळ 


पुस्तके प्रबोधन करणारे अजरामर साधन 

गुणवंताना न्याय देणारे विचारांचे दालन 

जागतिक स्तरावर प्रभावी असलेले सहाय्यक 

पोटाचा प्रश्न सोडविणारे विश्वासू मार्गदर्शक 


पुस्तके अतोनात प्रेम देणारे जीवलग साथी 

जगण्याचे जीवंत अनुभव देणारा सारथी 

जग रहाटीची बदलणारी एक विचारधारा 

इतिहासात जतन केलेला मोलाचा ढिगारा 


पुस्तके माणसे कायम जीवंत ठेवतात 

त्यांच्यातील सुप्तगुणांना अमर करतात 

जगाला परिवर्तन करण्यास त्यांचे योगदान 

दु:खावर फुंकर घालण्यास त्यांचे खरे जीवदान 


पुस्तके शून्यातून विश्व निर्माण करणारी असतात 

असामान्य माणसाला कायम प्रेरणा देणारी ठरतात 

त्यांचे आदर्श मानवी जीवनाला वळणबिंदू देतात 

सत्य,न्यायी विचारांचे विश्वकोष आदर्श ठरले जगात 


 पुस्तके इतिहासाची कायम आठवण सांगतात 

 विचारवंत,थोरांच्या,विद्वानांच्या गोष्टी कथन करतात 

 प्राणी,पक्ष्यांची मनमोहक कहाणी ऐकवतात 

 निसर्गाच्या सानिध्यात जगायला शिकवतात 


पुस्तके प्रेमळ असतात खऱ्या प्रेमाचा वर्षाव करतात 

नश्वर धनापेक्षा शाश्वत शब्दधन अमर्याद देतात 

तेच माणसाचे खरे जीवन धन आहे याची जाणीव करतात 

भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळाची जगाला शिकवण देतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational