STORYMIRROR

sunny bhosale

Tragedy

4  

sunny bhosale

Tragedy

बुडलेलं घर

बुडलेलं घर

1 min
93

बाप्पा, बुडलं सगळं घरटं 

घरट्यातलं सगळं बुडून सडून गेलं

घरट्यातलं एक पिल्लु 

आईच्या कुशीतच मेलं

उरल्या पिलांना तरी वाचवना

बाप्पा आता तरी तू ये ना


आईचा अन गाईचा एकच हंबरडा होतोय रे

एका बिस्किटापायी बाप माझा

गळ्या इतक्या पाण्यात जातोय रे

डोक्या इतक्या पाण्यात

आता एक थेंब पण आसवांचा बघवेना

बाप्पा आता तरी तू ये ना


किती जणांचे केले विसर्जन पाण्यात

कित्येक जणांना मारलं पाण्याविना

पाणी हेच जीवन

पाण्यासाठी अन् पाण्यामुळे मरण तू थांबव ना

बाप्पा आता तरी तू ये ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy