STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

पुस्तक

पुस्तक

1 min
201

ग्रंथ हेच गुरु 

देई ज्ञान भारी 

पुस्तक दिनाचे 

नमन त्रिवारी


पुस्तक आहे सखा 

ज्ञानाची शिदोरी 

सर्वांनी वाचावे 

सखा घरोघरी


पुस्तकांचे रोज 

करावे पठण 

देतात संस्कार 

करावे चिंतन 


भावना दाखवे 

खरे-खोटे सांगे 

चुकता हा रस्ता 

खरा मार्ग शोधे 


मार्गदर्शक हा 

सोबत असे हा 

एकांत असता 

संगत देई हा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational