STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

घे विसावा क्षणभर

घे विसावा क्षणभर

1 min
315

कणभर सुखासाठी

झटणे होते मणभर

झटणेच आहे जिणं

घे विसावा क्षणभर.


धारा घामाच्या

वाहतात भाळावर

बोटाने घे टिपून

घे विसावा क्षणभर.


भाकरीचं ओझं नित्य

घेतलेले माथ्यावर

शमव तहान थोडी

घे विसावा क्षणभर.


रस्ता संपत नाहीच

धोका उभा वळणावर

दगड मैलाचा पाहून

घे विसावा क्षणभर.


अपेक्षांचं गाठोडं

ज्याच्यात्याच्या उरावर

उरक हवा कामाचा तसा

हवा विसावा क्षणभर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational