STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

तया सत्कर्मी रती वाढो

तया सत्कर्मी रती वाढो

1 min
223

*************************

  दिलास अनमोल जन्म मज

  तया सत्कर्मी रती वाढो,

  लाभलेल्या क्षणांना आता

  ध्यास तव कार्याचा लाभो....


  तूच रे कर्ता नि करविता

  तोड सारे मायाजाळ इथले,

  मन वाहून जावे तव चरणी

  कुविचार नष्ट होऊनी मनातले..


  पामर मी तर भगवंता येथली

  कार्ये हातून तुझे करूनी घे,

 या जन्माचा हरक्षण सत्कारणी

  श्वासांना नवा अर्थ येवू दे....


  हात जोडूनी जया विनविते

  कार्यास तुझ्या आशिष दे,

   नकोच ऐहिक दान कोणते

  मनशांतीचा मार्ग स्फुरू दे...

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational