शब्दांची किमया
शब्दांची किमया
शब्दांचे भांडार ! पुस्तके वाचावी !
महिमा वर्णावी ! पुस्तकांची !!१!!
जगी सर्व ज्ञानी ! असा तो असावा !
मनाने पुजावा ! अंतरात्मा !!२!!
ज्ञानाचा वारसा ! शब्दात सांगावा !
वाचून पहावा ! अंतरंगी !!३!!
अखंड वाहतो ! ज्ञानाचा सागर !
जीवना आकार ! क्षणोक्षणी !!४!!
शब्दांचे प्रकार ! साहित्यात किती !
उजळल्या ज्योती ! शब्दरूपी !!५!!
मराठी माऊली ! विश्वाची जननी !
वंदन करुनी ! ज्ञानराजा !!६!!
संस्कार सांगती ! जीवनात खरे !
पुस्तक वाचा रे ! आयुष्यात !!७!!
-----------------------------------------