STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

पुस्तक दागिना-कविता

पुस्तक दागिना-कविता

1 min
202

मला तारीले,तारीले पुस्तकाने 

मला घडविले, घडविले पुस्तकाने 

जग दाखविले,दाखविले पुस्तकाने 

संस्कार शिकविले,शिकविले पुस्तकाने 


मला शिक्षण,शिक्षण दिले पुस्तकाने 

मला ज्ञान मिळाले,मिळाले पुस्तकाने 

सत्य विचार लाभले,लाभले पुस्तकाने 

गरीबीतून शिक्षण,शिक्षण पुस्तकाने 


मला मोठे केले,केले मोठे पुस्तकाने 

अन्याय,अत्याचार दूर झाले पुस्तकाने 

जगात जगण्याचे शिकविले पुस्तकाने 

पक्षी,प्राण्यांची माहिती दिली पुस्तकाने 


संत,विद्वान घडविले पुस्तकाने 

थोर विचारवंत,शास्रज्ञ निर्मिले पुस्तकाने 

आईबापाचे प्रेम,शिकविले पुस्तकाने 

सुख,शांतीचा धडे मिळाले पुस्तकाने 


मला दु:खात सावरले पुस्तकाने 

मोठी हिम्मत दिली पुस्तकाने 

कष्ट करण्याचे धैर्य दिले पुस्तकाने 

दया,नम्रता,आदर शिकविले पुस्तकाने 


मला लेखणी दिली हातात पुस्तकाने 

त्यातून प्रबोधन शिकविले पुस्तकाने 

ऋण आल्या जन्माचे सांगितले पुस्तकाने 

शब्दरुपी ज्ञानविश्वकोष जगाला पुस्तकाने 


चांगले विचार,प्रेरणा मिळाली पुस्तकाने 

अनाथांना मदत शिकविली पुस्तकाने 

बेसहाराना दिला आश्रय पुस्तकाने 

अंध,दिव्यांग मदत शिकविली पुस्तकाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational