निरोप समारंभ
निरोप समारंभ
घेता निरोप आज शाळेचा
मनात असेल ताण स्वप्नांचा
शिकविला जो धडा गुरूंनी
तो अमलात आण जीवनी....
परीक्षा येत आहे जवळ
धीर तू सोडू नकोस
अपेक्षा शाळेच्या अन् आई-वडीलांच्या
ताण त्याचा म्हणू नकोस....
जिद्दीने अभ्यास केला
त्याची ही तालिम आहे
अजून आयुष्याची परीक्षा
द्यायची आहे तिथे गुरूमंत्रच कामी येणार आहे....
वाटा अनेक दिसतील तुला
पण जाशील त्या वाटेला
साज चढव यशाचा.....
असंख्य वादळे येतील
पदवीनंतरही गोंधळून जाशील
परी स्वप्नांची आस सोडू नकोस
वेळ प्रत्येकाची येते
हे मात्र विसरू नकोस.....
आनंदी रहा-स्वच्छंदी बागडा
शिक्षणाचा वसा जगभर पसरवा
शाळेची ओळख आसमंत गिरवा
तिला किर्तीचे वलय लाभो
काम असे हातून होऊ द्या.....
