STORYMIRROR

Kranti Shelar

Abstract Inspirational Others

3  

Kranti Shelar

Abstract Inspirational Others

जीवन एक संघर्ष...

जीवन एक संघर्ष...

1 min
985

सोपं नसतं 

आयुष्यात 

सहज वावरण 

आपल्याच स्वप्नांना 

डोळ्यांदेखत दूर 

जाताना पाहणं..... 


सोपं नसतं 

प्रत्येक वेळी 

संयमाचा मंत्र जपणं

आपल्याच ध्येयाला

आपणचं दूर करणं...... 


सोपं नसतं

नियतीच्या परीक्षेला

परत परत सामोरे जाणं

जिंकणार की हारणार 

हे माहित नसताना

परत त्याच ध्येयाचा ध्यास घेणं.... 


सोप नसतं 

स्वप्नांचा प्रवास करणं

खचलेल्या अवस्थेतही 

त्यातचं मनसोक्त गुरफटणं.... 


सोपं नसले जरी 

तरी प्रयत्नांच्या शर्थीने 

तो अवघड 

किल्लाही लढवता येतो शांततेने


असे हे जीवन एक संघर्ष असते

हारणं-जिंकणं तर नित्याचे बनते

उठून धैर्याने उभं रहाणे शहाणपण ठरते

संयमाने पुढे जाणाऱ्याला येथे यश नक्कीच मिळते... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract