STORYMIRROR

Kranti Shelar

Others

3  

Kranti Shelar

Others

मी पुन्हा येईल

मी पुन्हा येईल

1 min
189

दुःखाची धार देऊन जरी पछाडले नशीबाने मला, 

धैर्याचे शस्त्र घेऊन त्याला दोन हात करण्यास मी पुन्हा येईल.....

आत्मसन्मानाचा तुम्ही कराल किती बलात्कार माझ्या,

संहाराचे त्रिशूळ घेऊन सामना करण्यास मी पुन्हा येईल..... 

झोपली जरी असेल ती न्यायदेवता, 

तरी सत्याच्या शब्दांना धार घेऊन न्यायासाठी मी पुन्हा येईल...... 

जरी सुटले असतील ते लोकांच्या नजरेतून, 

पण त्या प्रत्येक गुन्हेगारी नजरेला नेस्तनाबूत करण्यास मी पुन्हा येईल.... 

मी पुन्हा येईल.... 

मी पुन्हा येईल.... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन