STORYMIRROR

Kranti Shelar

Others

4  

Kranti Shelar

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
340

नारी तू नारायणी 

मेहनती तू आदीकाळपासूनी

ऐकतो तुझी आम्ही गाथा

कौतुक तुझे वर्णवू किती मनी....


तुझ्या उदरात जन्मले छत्रपती

मांडीवर खेळले संत-महिष्मती

तु अनामिक, अतुलनीय स्त्री

थोर जाहले किर्तीवंत 

उज्ज्वल अशीच तुझी यशकिर्ती..... 


शतका मागुनी शतके

तु धैर्यानेच लढलीस

असंख्य नकारात्मक ज्वालांना

तुझ्या सुविचारांनी मात दिलीस...... 


नात्यांतील गुंफण तू 

उजाड आयुष्यातील तेवता दीप तू

तुझ्या यशाच्या गाथा सातासमुद्रापार 

त्यातल्या भविष्याचा जागर तू....... 


रंजल्या गांजल्यांना 

सावरणारी तु मदर तेरेसा 

अशिक्षितांना शिक्षणाचे वलय 

प्रदान करणारी तु सावित्री 

अलौकिक तुझा महिमा 

तुच दलितांची दात्री....... 


आधुनिकतेचा झेंडा तुझा अटकेपार

उसळणाऱ्या असामाजिक लाटांना 

बसला तुझ्याच कर्तृत्वाचा मार

पार केल्या तु असंख्य बंदिस्त भिंती

म्हणूनच की काय तुझी आज 

स्त्री तू महान अशी आहे गं किर्ती.......


Rate this content
Log in