आयुष्य असं जगावं
आयुष्य असं जगावं
आयुष्य रमत-गमत जगावं
हक्काने वाटलं तर मनसोक्त रडावं....
आयुष्य म्हटले जर थांब थोड आता रे
तर थोडं थांबुन रे बघावं पुन्हा झेप घेण्यासाठी....
पडता पडता सावरायला शिकावं
कोणी जोरात धक्का मारला तरी हसायला शिकावं.....
सुन्न वाटलं कि थोड रडावं
रडता रडता मात्र पुन्हा लढायला सज्ज व्हावे....
कधी मन दुखावले गेलं तर शांत रहावे
आपल्या हक्काच्या माणसांशी मनमोकळे बोलावे........
कधी आलचं नैराश्य तर मन शांत ठेवावे
सकारात्मक राहून पुन्हा नव्याने उभं रहावे.......
सतत आनंदी आठवणींच्या स्पर्शाने न्हावून
निघावं
दुःखी मनाला कायम हसायला भाग पाडावं.......
एक दिवस नशिबही म्हणेल कि उगाच याच्या आयुष्याशी मी खेळतोय
हा तर मस्त धीटाईने आयुष्याच्या वाळवंटावर हिरवळ मानून चालतोय.. .......
आयुष्य असचं जगावं बिनधास्त!!!!