तु वात हो....
तु वात हो....
तु वात हो मनाची
मनातल्या वाईट काळ मिटवणारी
तेवती तु वात हो.....
तु वात हो अश्रुंची
दुःख शोषूण घेणारी तु एक वात हो.....
तु वात हो चांगुलपणाची
त्यावरची काळी काजळी
साफ करणारी तु वात हो.....
भेदरलेल्या मनाची वात हो
आयुष्यातील बेसुर सुरांना
सुर देणारी एक वात हो.......
सगळेच हसतात हसवतात
पण तु हसण्याच्या मागचं
दुःख मिटवणारी वात हो........
नको तो नुसता झगमगाट
पण तु सतत तेजाकडे
घेऊन जाणारी वात हो........