STORYMIRROR

Kranti Shelar

Inspirational

4  

Kranti Shelar

Inspirational

यशाचे गाव....

यशाचे गाव....

1 min
315

यशाचा गाव हा नसे फार दूर, 

अडथळ्यांच्या रस्त्यांवर पसरे धैर्याचा धुर...


संघर्षाच्या या वाटेवर, 

अपयशाचे असंख्य सुरूंग पेरलेले, 

तू हिंमत हारू नकोस, 

करशील त्यांना निष्क्रिय, 

तुझ्या मनगटाच्या जोरावर....


प्रयत्नांच्या घरात वसे किर्तीचा दिवा, 

यशाचा देव सगळ्यांनाच हवा,

कष्टाची झालर त्यावर पसरू देत, 

मग बघ ही दुनिया कशी तुझ्या मागे फिरेल ते......


होऊ दे संघर्ष पुन्हा, 

मोठी स्वप्ने पाहणे हा नसे रे गुन्हा, 

उठ पेटून पुन्हा,

मेहनतीचे फळ मिळेल बघ तुला, 

ते मिळताच तू खुलणार पुन्हा......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational