माझे देशप्रेम
माझे देशप्रेम
भारत आम्हा प्राणाहून प्रिय आहे
सर्वात सुंदर देश आमचा आहे
हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई
सर्व आहेत इथे भाई भाई
मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती,
एकूण बावीस भाषा येथे बोलल्या जाती
भारत आम्हा प्राणाहून प्रिय आहे
सर्वात सुंदर देश आमचा आहे.
भाषा,वेष, खानपानामध्येही विविधता आहे.
तरीही आमच्या विचार आचारात एक प्रकारची एकता आहे.
मंदिरं, मस्जिदं , चर्च, गुरुद्वारा सर्वत्र आहे
प्रत्येकाला एकदुसऱ्या धर्माचा आदर आहे
भारत आम्हा प्राणाहून प्रिय आहे
सर्वात सुंदर देश आमचा आहे
जन्मभूमी ही आमची पूर्ण जगाची शान आहे.
संत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, अनेक हुशार लोकांचे हे जन्मस्थान आहे. विविधतेने नटलेला नी त्याला निसर्गाचेही वरदान आहे.
म्हणून सर्व देशात त्याला महत्वाचं असं स्थान आहे
भारत आम्हा प्राणाहून प्रिय आहे
सर्वात सुदंर देश आमचा आहे
मानवतावादी, लोकशाही असलेला देश माझा आहे.
गर्व आहे मला की मी ही एक भारतीय आहे.
भारत आम्हा प्राणाहून प्रिय आहे
सर्वात सुंदर देश आमचा आहे
