क्षण
क्षण
1 min
113
जीवनातील प्रत्येक क्षण
एक आव्हान असतो.
निघून जाताना काहीतरी
तो देऊन जातो.
कधी प्रश्नांची उत्तरे देतो
तर कधी प्रश्नच निर्मितो
पण नेहमी आपल्यातच रमवतो
असा हा प्रत्येक क्षण
एक आव्हान असतो.
कधी आनंदमय म्हणून समोर येतो
पण थोडया वेळाने दुःखाकडेच वळवतो
असा हा क्षण नेहमीच आपल्याला फसवतो
परंतू प्रत्येक क्षण एक आव्हान असतो.
कधी कधी हा क्षण प्रेमाचे रूप दर्शवतो
परंतू नंतर व्यव्हारातच नेतो.
हाच क्षण कधी कधी साहाय्यक ठरतो
असा हा प्रत्येक क्षण एक आव्हान असतो.
असे हे क्षण सुखदुःखाचे साथी असतात
जे आयुष्यभर साथ देतात
आणि जाताना काहीतरी देऊन जातात.
