♥️प्रेम, लव्ह आणि प्यार !♥️
♥️प्रेम, लव्ह आणि प्यार !♥️
प्रेमाला मुळीच नसते कसले बंधन,
अवचित येते कधीही नी कोणावरही मन.
मन म्हणजे जणु फुलपाखरू असते
कधी या फुलावर, कधी त्या फुलावर बसते.
कधी आवडे रंग कुणाचा,
कधी आवडे छंद कुणाचा.
कधी भावतो विचार कुणाचा,
कधी आकर्षतो आचार कुणाचा.
जरी आवडले बरेच तरी
जडे प्रीती केवळ एकाचवरी .
प्रेम होई ना केवळ पाहून,
ह्रद्याची धडधड ठरे कारण.
प्रेम हे मनोहर, नितळ स्वप्न असते
जब्बरदस्तीचा व्यवहार ते कधीच नसते.
जुळता मने दोहोंची, नात्यात येई बहार
सिद्ध करे ती.... . प्रेम, लव्ह आणि प्यार !

