माय जिजाऊ
माय जिजाऊ
माय जिजाऊ महाराष्ट्रावरती
थोर तुझे उपकार
देव देश आणि धर्मा पायी
पदरी बांधलास अंगार
दुर्बलांच्या रक्षणासाठी
मांडला विश्वाचा संसार
माय भगिनींसाठी
खोललेस मुक्तीचे द्वार
तूच दिला आम्हाला शिवबा
अन शिवबाची तलवार
बाल शिवाजी वरती तू
केले असे संस्कार
म्लेच्छांचा करूनी संहार
उतरला पृथ्वीचा भू भार
केला रयतेचा उद्धार
भोसल्यांची सून तू अन्
जाधवांची कन्या का
पुत्र प्रसवला ऐसा
ज्याचा तिन्ही लोकी डंका
अमर कीर्ती राहील तुझी
जोवरी चंद्र सूर्य तारका
