STORYMIRROR

Archana Rahurkar

Inspirational

4  

Archana Rahurkar

Inspirational

सबला तू हो

सबला तू हो

1 min
439

अबला होऊन जगू नकोस सबला तू हो

रुढी-परंपरा सोडून काळाबरोबर जगण्या

सुसज्ज आता तू हो......llधृll


सावित्रीचा वसा घेऊन शिक्षण घेत मोठी हो

स्वत:ची ओळख दाखवून देत ठसा उमटव

झुगारुन देत बंधनांना स्वच्छंदी तू हो

अबला तू होऊन जगू नकोस सबला तू होll१ll


तुच दुर्गा, तू भवानी, तुच रणचंडीका हो

शिकव धडा या नराधमांना रणरागीणी तू हो

सामना कर झाशीची राणी होऊन सुरक्षित हो

अबला तू होऊन जगू नकोस सबला तू होll२ll


नव्या पिढीत जन्मलीस तू आधुनिक धडे गिरव

शिकवण्या धडा व्याभिचारी लोकांना सज्ज हो

स्वबळावर संरक्षण करीत सुरक्षित व मुक्त हो

अबला तू होऊन जगू नकोस सबला तू होll३ll


लाठी, काठी बाळग घाबरू नकोस कर दोन हात

नव्या पिढीची नारी तू झुगारून दे या बंधनास

संरक्षणाचे धडे शिकण्याची मनी घेऊन आस

आज आम्ही काही कमी नाही दाखवून दे जगतासll४ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational