नदी वाहे निरंतर...!
नदी वाहे निरंतर...!
पिढ्यान् पिढ्या
नदी वाहे निरंतर
ठेवून नजर
समोर...!
सारासार विचाराने
आपला तोल सांभाळत
आकार बदलत
विनम्र...!
तिच्या पिढ्या
जन्मतात मान वळवून
अखडते पाहून
नजरही...!
नवे ऋतू
येतात आणि जातात
साद घालतात
तिलाच...!
तिलाच आता
अजिबात नाही थांबवत
चहुदिशेला पाहत
वाहतेच...!
कधी आश्चर्याने
जग निरखत राहते
वाहू लागते
वळणावळणाने...!
खळाळते पाणी
दोन्ही काठावर जिरवते
झाड उगवते
एकेक...!
म्हणून तर
नदी वाहे निरंतर
तिच्या अस्तित्वावर
सृष्टी...!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
'अंतरीच्या खोल डोही' तून....
