STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

4  

Pradnya Ghodke

Inspirational

शीर्षक : - सावली बनून रहावे...!

शीर्षक : - सावली बनून रहावे...!

1 min
4


कौतुक करण्यासाठी

चार शब्द राखावे

कधी पचवावे

निंदेचेही...!   


प्रेमाच्या कुशीत

काळोखालाही असे सजवावे

अलंकृत करावे

शृंगाराने...!   


सुखदु:खातही बरोबर

आशेचा किरण व्हावे

दिपून पळावे

दु:खाने...!   


संकुचित विचारांना

मनातून खोडून काढावे

रुक्ष बनावे

धैर्याने...!   


संसारिक जीवनात

सावली बनून रहावे

सहचर व्हावे

एकमेकांचे...!   


यशाच्या मार्गावर

आरूढ असे व्हावे

स्वार व्हावे

संकटावर...!   


गरजूंच्या मदतीसाठी

आधाराची सावली बनावे

ऋण फेडावे

सामाजिक...!   


         सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational