STORYMIRROR

Pradnya Ghodke

Fantasy

4  

Pradnya Ghodke

Fantasy

सावल्यांचे भास किती?...

सावल्यांचे भास किती?...

1 min
6


उन्हें उतरताच

सावल्यांचे भास किती

शोधत राहती

पाऊलखुणा...!   


कोणत्या आशेवर

ज्योत कापते काळोखाला

वाराही हुलकावणीला 

येतसे...!   


सावल्यांच्या भासांना

प्रत्येक वृक्ष साक्षीला

बागेत गोठलेला

हंगामही...!   


प्रत्येक भासामागे

वचने युगांची किती

खेळे नियती

खेळ...!   


प्रीतीत वाहिलेले

भार जडशीळ होती

कैफियत किती

मांडावी?...   


जाताच बहर

पुन्हा डोळे पुसती

भास होती

सावल्यांचे...!   


पुन्हा फिरूनी

बहर जेव्हा येती

श्वास रोखती

अखेरचा...!   


                 सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

'अंतरीच्या खोल डोही' तून....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy