STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

4  

Pradnya Ghodke

Inspirational

अंतरंग उजळले...!

अंतरंग उजळले...!

1 min
4


जेव्हा कधी

पहाट उजळते लख्ख

होतो थक्क

पाहुनिया... 


अंतरंग उजळले

सूर्य कोवळा पाहता

लाभे कोवळीकता

मनाला... 


जेव्हा सकाळ 

लख्ख उजळते उन्हात

दिसते घनात

प्रभा... 


मनाची सकाळ 

जेव्हा अशी उजळते 

तेजोरसात नहाते 

रुपेरी... 


सायंकाळी घरट्यात 

जेव्हा येतात पक्षी

ठरवतात नक्षी

रांगोळीची... 


एकेकाळी सायंकाळी

किती रंग फाकले

आपोआप झाकले

काळाने... 


संध्येनेही सांजवेळी

असे अंतरंग उजळले

रंग उधळले

सुवर्ण... 


          प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational