STORYMIRROR

Pradip Joshi

Inspirational

4  

Pradip Joshi

Inspirational

आनंदी मन

आनंदी मन

1 min
600

मन कसं हवं आनंदी, दुःख हलकं करणारं।

डोकं कसं हवं शांत, अग्नीला थंड करणारं।


काळीज कसं हवं घट्ट, दगडाला पाझर फोडणारं।

शब्द कसं हवं गोड, तिखटाची गोडी वाढवणारं।


हात कसं हवं सढळ, सहकार्यासाठी पुढं येणारं।

पाय कसं हवं बळकट, धावणाऱ्याला बळ देणारं।


डोळं कसं हवं तीक्ष्ण, भिरभिरत्या नजरेनं पाहणारं।

कान कसं हवं अधीर, सतत आतुर झालेलं।


ओठ कसं हवं मऊ, स्पर्शाला आतुर झालेलं।

गाल कसं हवं गोबरं, रूप सौंदर्य खुलवणारं।


जीवन कसं हवं मस्त, संघर्षासाठी तयार असलेलं।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational