मोबाईल
मोबाईल
1 min
355
म्हणे मोबाईल आला
जीवन बदलून गेला
म्हणे क्रांती झाली
बदलाचे वारे आले
बोलण बंद झाल
त्याने घेरले मनाला
मुके जीवन आले
आपल्या नशिबाला
मेसेज नित्य येतात
डीपी रोज बदलतात
नको त्या चर्चा होतात
संसार मोडित निघतात
परके आपले वाटतात
आपले परके होतात
नाती संपुष्टात येतात
संवाद वाद होतात
दृढ़ होते दोघांची मैत्री
गप्पाना पण येते उधाण
मनाची होते घालमेल
बुद्धि टाकली जाते गहाण
